Video: चाकणच्या थेट मर्सिडीज बेंज कंपनीतच शिरला बिबट्या; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:07 AM2022-03-22T11:07:49+5:302022-03-22T11:08:31+5:30
वनविभागाच्या कर्मचार्यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले
कुरुळी : चाकण एमआयडीसीमधील मर्सिडीज बेंझ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद कऱण्यात अखेर यश आले आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले आहे.
चाकण एमआयडीसीमधील कुरुळी निघोजे येथील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली होती. सोमवारी सकाळी मर्सिडीज कंपनीच्या सीसीटिव्ही मध्ये सर्व प्रथम हा बिबट्या कंपनीत शिरल्याचे निदर्शनास आले सदरचा बिबट्या कंपनीत नेमका कुठून आला हे स्पष्ट झालेले नाही. सकाळी पाचच्या बिबट्या कंपनीच्या सुमारास आवारात दिसल्याची माहिती कंपनीच्या कर्मचार्यांनी वन विभागाला दिली.
चाकणच्या मर्सिडीज बेंज कंपनीत बिबट्याचा वावर #Pune#leopardpic.twitter.com/fCl2kvXHeU
— Lokmat (@lokmat) March 22, 2022
सकाळ पासून कंपनीसमोर बघ्यांनी गर्दी केली होती. कामगार व बसेस बाहेर थांबविण्यात आलेल्या होत्या. हा बिबट्या रात्रीच कंपनीत घुसला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तवला. बिबट्याच्या फोटो वरून हा पूर्ण वाढ झालेला बलदंड बिबट्या असल्याची बाब समोर आली आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध केले .बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत याला जेरबंद केलं आहे . हा परिसर जंगलालगत नसल्यामुळे नागरी भागात बिबट्या आल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.