चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:55 PM2023-05-01T12:55:58+5:302023-05-01T12:56:36+5:30

मुलगा आणि पती दोघेही बुडत असताना पत्नीने पाण्यात उडी मारली पण मदत मिळाल्याने ती वाचली आणि बापलेकाने जीव गमावला

The little one fell into the field while playing; The father went to save them and both of them drowned | चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

मलठण/पुणे : जांबुत ता शिरूर जि पुणे येथील चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रा मधे बापलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्यांची दुर्दैवी घटना घडली असुन त्यांना वाचविण्यासाठी गेलेली आई स्नेहल मात्र मदत मिळाल्यांने वाचली आहे.

यामधे सत्यवान शिवाजी गाजरे व दिड वर्षाचा मुलगा राजवंश दोघे मृत्यु झाले आहेत. बेल्हे जेजुरी महामार्गावर जांबुत (पंचतळे) येथे चारंगबाबा हॉटेल व कृषी पर्यटन केंद्र आहे. हे शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे असुन  रविवारी दि. ३० रोजी सांय ४ च्या सुमारास येथे त्यांचा मुलगा सत्यवान शिवाजी गाजरे (वय २८) सुन स्नेहल सत्यवान गाजरे (वय २५) तसेच नातु राजवंश ( वय दिड वर्षे) हे हॉटेल परीसरात होते. येथे परीसरात शेततळे असुन सून व मुलगा कामात असताना राजवंश खेळत खेळत शेततळ्यात जाऊन पडला. त्याला वाचविण्यासाठी सत्यवान तळ्याकडे कडे धावत जाऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र त्यालाही पोहता येत नव्हते. तोही बुडू लागला. ते पाहुन त्यांची पत्नी स्नेहलनेही पाण्यात उडी मारली. तिलाही पोहता येत नसल्यांने तीही बुडू लागली. 

त्यावेळी सत्यवानचा भाऊ किरण व वेटर याला आरडाओरडा ऐकु आल्याने तो धावत गेला त्याला स्नेहलला वाचविण्यात यश आले. मात्र भाऊ सत्यवान व राजवंशला त्यांनी वर काढुन तत्काळ जांबुत येथे खाजगी दवाखाण्यात नेले तेथुन,आळे येथे नेले मात्र ते दोघांचा मृत्यु झाला होता. त्यांच्यावर रात्री उशीरा जांबुत येथे अंतीम संस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The little one fell into the field while playing; The father went to save them and both of them drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.