‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

By श्रीकिशन काळे | Updated: December 23, 2024 20:16 IST2024-12-23T20:12:00+5:302024-12-23T20:16:20+5:30

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे.

The lottery for 'Purushottam' will be held on Thursday; Veteran actor Manoj Joshi will distribute the prizes. | ‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

पुणे :महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस् गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक प्रदान करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांची उपस्थिती असणार आहे.

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस् काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे.

महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: The lottery for 'Purushottam' will be held on Thursday; Veteran actor Manoj Joshi will distribute the prizes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.