"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:25 AM2023-01-27T10:25:33+5:302023-01-27T10:26:00+5:30

पत्नीने माहेरी निघून जावे यासाठी आरोपीने वारंवार तिला पूर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली

"The maids in Germany are better than you," said the wife's torture; A case has been registered against the husband who lives in Germany | "जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

Next

पुणे/किरण शिंदे : मूळचा पुण्यातील बाणेरचा परंतु सध्या जर्मनीत वास्तव करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये नोकर बायकाही तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तू लो स्टँडर्ड आहेस असे म्हणत या व्यक्तीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार या व्यक्तीच्या पत्नीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन योगराज ग्रोवर (वय 43, रा. सेरेनो, पॅन कार्ड क्लब रोड बाणेर, सध्या जर्मनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2006 पासून हा सर्व प्रकार सुरू होता. लग्न झाल्यापासून आरोपी फिर्यादीला त्रास देत होता. सुरुवातीला दिल्लीतील गुडगाव येथे, त्यानंतर औंध आणि बाणेर परिसरात राहत असताना वेळोवेळी आरोपी पत्नीला त्रास देत होता. 'तू सुंदर दिसत नाहीस, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमतच नाही, तू लो स्टॅंडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर बायकापण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत' असे म्हणून त्याने वारंवार पत्नीचा छळ केला. 

पत्नीने माहेरी निघून जावे यासाठी आरोपीने वारंवार तिला पूर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली आणि शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: "The maids in Germany are better than you," said the wife's torture; A case has been registered against the husband who lives in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.