Kidnapping: विवाहितेने प्रेमासाठी पतीला फसवले; प्रियकराच्या मदतीने स्वत:चेच अपहरण केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 08:14 PM2022-04-07T20:14:55+5:302022-04-07T22:27:51+5:30

नारायणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवल्यावर हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

The married woman cheated on her husband for love She kidnapped herself with the help of her boyfriend | Kidnapping: विवाहितेने प्रेमासाठी पतीला फसवले; प्रियकराच्या मदतीने स्वत:चेच अपहरण केले

Kidnapping: विवाहितेने प्रेमासाठी पतीला फसवले; प्रियकराच्या मदतीने स्वत:चेच अपहरण केले

Next

नारायणगाव : दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचे अपहरण केल्याची घटना बुधवार (दि ६ ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील वैद्य वस्ती येथे घडली, नारायणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या चार ते पाच तासात तपास करून आरोपी सह महिलेला ताब्यात घेतले असता महिलेने आपल्या प्रियकराच्या साथीने स्वत: च्या अपहरणाचा बनाव केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. महिलेच्या पतीने नारायणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

नारायणगाव पोलिसांनी अवघ्या चार ते पाच तासात आरोपींना पकडल्यानंतर महिलेने लग्नापूर्वीच्या ओळखीतून प्रियकराच्या साथीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशी माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी महेश लोखंडे व राहूल कनगरे रा. राहूरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ६ रोजी दु. १ च्या सुमारास नारायणगाव येथील वैदवाडी या ठिकाणी अज्ञात इसमांनी महिलेला एका पांढरे रंगाच्या कारमध्ये येऊन काहीतरी विचारण्याचा बहाणा करून ओढून गाडीत ओढून अपहरण केले. त्यानंतर अशा फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. त्यानुसार नारायणगावचे पोलिस तपास पथकाने प्रथमतः वाहन क्र. ६८७३ पुर्ण नंबर स्पष्ट दिसत नसल्याने सीसीटीव्हीचे आधारे वाहनाच्या पूर्ण नंबरचा शोध घेतला. हे वाहन मारुती कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट मॉडेल क्र. एम. एच. ०४ डी. डब्लू. ६८७३ असल्याचे समजले.

त्यानुसार वाहनाची माहिती काढून ते बेल्हा रोडच्या नगर बाजुकडे गेल्याचे दिसून आल्याने तपास पथक नगरच्या दिशेने रवाना झाले. नगर मध्ये वाहन मालकाने सदर वाहन सकाळी ८:३० वा महेश लोखंडे व राहूल कनगरे या दोघे सायंकाळी वाहन देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून अवघ्या चार तासात वाहन व महिलेला ताब्यात घेऊन तिचा जबाब घेतला असता तिने स्वतःच या अपहरणाचा बनाव केला असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

Web Title: The married woman cheated on her husband for love She kidnapped herself with the help of her boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.