Gram Panchayat Result Pune: खेडच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; एकहाती सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:50 PM2022-12-20T14:50:22+5:302022-12-20T15:02:44+5:30

सरपंचपदाच्या निवडणुकीत नोटाला अवघे एक मत

The NCP flag was hoisted on the village panchayat One handed power | Gram Panchayat Result Pune: खेडच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; एकहाती सत्ता

Gram Panchayat Result Pune: खेडच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; एकहाती सत्ता

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या विचारांच्या श्री भैरवनाथ महाराज ग्रामविकास पॅनलने ८-० अशा मोठ्या फरकाने विजय संपादन केला आहे. ग्रामपंचायतीवर थेट जनतेतून सरपंचपदाच्या लढतीत दौलत बाळासाहेब मोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ५४ मतांनी पराभव करून विजय मिळवला. सरपंचपदाच्या निवडणुकीत नोटाला अवघे एक मत मिळाले.

सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागांसाठी चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असलेल्या सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी थेट जनतेतून वैभव कोंडाजी पवार विरोधात दौलत बाळासाहेब मोरे यांनी निवडणूक लढवली. यामध्ये दौलत मोरे यांना ३२२ तर वैभव पवार यांना २६८ मते मिळाली.

प्रभाग एकमधून मनोज राजेंद्र मोरे (१०१ मते), स्वाती शशिकांत मोरे (१०० मते), अच्युता अजित पवार (९२ मते), प्रभाग दोनमधून कांचन रमेश थोरात (११९ मते), राजेंद्र दौलत गाडे (१२२ मते), प्रभाग तीनमधून अविनाश रंगनाथ मोरे (१२४ मते) व ज्योती संतोष साबळे (१३३ मते) विजयी झाले. विजयी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच शशिकांत मोरे, पै. अनिल साबळे, उमेश मोरे, दत्तात्रय गंगावणे, प्रकाश उगले, कांतीलाल चौधरी आदींनी केले. विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांच्या वतीने गुलालाची उधळण करत सत्कार करण्यात आला.

Web Title: The NCP flag was hoisted on the village panchayat One handed power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.