Pune Corona Update: दिलासादायक! शहरात सोमवारी कोरोना रुग्णसंख्या ५० च्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:50 PM2022-02-28T18:50:43+5:302022-02-28T18:56:01+5:30
दिवसभरात १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
पुणे : पुणे शहरात सोमवारी २ हजार ६४९ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी ४४ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर दिवसभरात १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १४५ इतकी झाली आहे.
शहरातसोमवारी एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या ६५ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २३.६६ टक्के इतके आहे. शहरात ७ रुग्ण इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर आणि ८ रुग्ण नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. आजपर्यंत पुण्यात ४४ लाख ८८ हजार १७९ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ६० हजार ४११ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैैकी ६ लाख ४९ हजार ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत ९३४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.