Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 09:24 PM2022-02-15T21:24:13+5:302022-02-15T21:24:22+5:30
शहरात सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे
पुणे : शहरात सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी, १५ फेब्रुवारी रोजी शहरात ३ हजार ८१८ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ३३४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ४ हजार २५२ एवढी आहे. सक्रिय रुग्णांपैैकी १२.९० टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यापैैकी ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर १९१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात रविवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैैकी ३ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात ४८५ व्हेंटिलेटर बेड, तर ३९४७ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शहरात आजवर ४४ लाख ४२ हजार २६९ चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५७ हजार ५१७ कोरोनाबाधितांचे निदान झाले. ६ लाख ४३ हजार ९३२ जण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ३३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.