Pune Corona: पुणेकरांना दिलासा; २ दिवसांपासून वाढणारी संख्या झाली कमी, सोमवारी ३३७७ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:42 PM2022-01-24T20:42:17+5:302022-01-24T20:42:37+5:30
शहरात सोमवारी दिवसभरात १२ हजार ५४३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली
पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात १२ हजार ५४३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ३ हजार ३७७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २६.९२ टक्के इतकी आहे. दिवसभरात ३ हजार ९३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ४६ हजार ३०२ झाली असून, आज १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ४९ जणांवर इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, २७ जणांवर नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. ३२८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३.२६ टक्केच रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासली आहे.
शहरात आत्तापर्यंत ४२ लाख ४९ हजार ५०७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख ९ हजार ७५६ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ५४ हजार २५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ९ हजार १९९ जण दगावले आहेत.