पुण्यातील एकनाथ शिंदे उद्यानाचा उद्घाटन सोहळा ऐनवेळी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:02 PM2022-08-02T12:02:56+5:302022-08-02T12:32:24+5:30

नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात

The opening ceremony of Eknath Shinde Park in Pune was canceled on time | पुण्यातील एकनाथ शिंदे उद्यानाचा उद्घाटन सोहळा ऐनवेळी रद्द

पुण्यातील एकनाथ शिंदे उद्यानाचा उद्घाटन सोहळा ऐनवेळी रद्द

googlenewsNext

पुणे : पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले होते. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आले असून ऐनवेळी हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. 

पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आल आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं होत. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला 

या प्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असही त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाही. परिणामी आजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आलं आहे. याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अशी महिती भानगिरे यांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा 

मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तालयात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पाऊणला ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट देतील. शिंदे दुपारी अडीचच्या सुमारास जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेतील. त्यानंतर ३ वाजता शिवसेनेच्या जाहीर सभेस संबोधित करतील. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी नुकताच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून शिंदे हे सर्मथकांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. तशीच सभा ते सासवड येथेही घेत आहेत. सासवड येथील पालखी तळ मैदानावर ही सभा होईल. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता ते हडपसर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम हांडेवाडीतील जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी होणार आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर व दत्त मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ९ वाजता गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांच्या आगामी उत्सवासंदर्भात बैठकीस उपस्थिती लावणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर सभागृहात ही बैठक होईल. रात्री ९.४५ वाजता कोथरूड येथून मोटारीने ठाण्याकडे रवाना होणार आहेत.

Web Title: The opening ceremony of Eknath Shinde Park in Pune was canceled on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.