Winter Session Pune : पुणेकरांना हुडहुडी...आणखी थंडी वाढणार..!
By श्रीकिशन काळे | Published: December 9, 2024 03:31 PM2024-12-09T15:31:32+5:302024-12-09T15:32:30+5:30
सध्या राज्यामध्ये पावसाचे सावट दूर झाले असून, आकाश निरभ्र झाले आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशावर आला असून, पुढील चार दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या राज्यामध्ये पावसाचे सावट दूर झाले असून, आकाश निरभ्र झाले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यामध्ये गारठ्यामध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे, तर पुण्यातील पारा १२ अंशावर आला आहे.
माळिण ८.३, तळेगाव ९.१ तर एनडीए १०.३ अंशावर नोंदवले गेले. सोमवारी (दि.९) पहाटे पुण्यात चांगलीच थंडी जाणवली आणि आता दुपारी देखील गारवा जाणवत आहे. आजपासून राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कमी-अधिक जाणवत आहे.
पुण्यातील किमान तापमान :
माळीण : ८.३
तळेगाव : ९.१
नारायणगाव : १०.१
एनडीए : १०.१
शिरूर : १०.७
लोणावळा : १०.९
हवेली : ११.३
शिवाजीनगर : १२.०
लवासा : १२.२
पाषाण : १२.४
कोरेगाव पार्क : १६.८
वडगावशेरी : १८.१
मगरपट्टा : १८.२