राज्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय; रुग्णसंख्या शंभरीपार, १७ जण व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:38 IST2025-01-28T10:37:59+5:302025-01-28T10:38:32+5:30
रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण

राज्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय; रुग्णसंख्या शंभरीपार, १७ जण व्हेंटिलेटरवर
पुणे : राज्यात जीबीएस रुग्णसंख्या १११ वर पोहोचली असून, यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण केले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत. जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये ६२ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत १९, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १४ रुग्ण असून, इतर जिल्ह्यांतील सहा रुग्ण हे पुण्यात उपचार घेत आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यात एक उच्चस्तरीय डाॅक्टरांची टीम नियुक्त केली आहे. महाराष्ट्राच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्ली, निम्हान्स बंगळुरू, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे यातील सात तज्ज्ञांचा समावेश आहे.
राज्यात जीबीएस रुग्णसंख्या १११ वर पोहोचली असून, यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण केले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत. जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये ६२ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत १९, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १४ रुग्ण असून, इतर जिल्ह्यांतील सहा रुग्ण हे पुण्यात उपचार घेत आहेत.
अशी रुग्णांची आकडेवारी
पुणे ग्रामीण - ६२
पुणे महापालिका क्षेत्र - १९
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र - १४
इतर जिल्ह्यांतील पुण्यात उपचार घेणारे - ६