मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात सुरू; साडेअकरा वाजता प्रतिष्ठापना होणार

By श्रीकिशन काळे | Published: September 19, 2023 10:45 AM2023-09-19T10:45:00+5:302023-09-19T10:45:40+5:30

ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून निघाली असून, कसब्यातील मंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत...

The procession of Ganpati, the first Kasba of Mana, begins in jubilation; Installation will be at half past eleven | मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात सुरू; साडेअकरा वाजता प्रतिष्ठापना होणार

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात सुरू; साडेअकरा वाजता प्रतिष्ठापना होणार

googlenewsNext

पुणे : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज (दि.१९) मानाच्या गणरायांचे वाजतगाजत विधीवत मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार असून, पहिला मानाचा कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे. ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून निघाली असून, कसब्यातील मंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत.

रास्ता पेठेतील मूर्तीकार अभिजित धोंडफळे यांच्या वास्तूमधून कसबा गणपतीची मुर्ती पालखीत विराजमान झाली आहे. तिथून वाजतगाजत ही पालखी कसबा पेठेत येईल आणि तिथे मंडपामध्ये चांदीच्या सिंहासनावर बाप्पा विराजमान होती. सकाळी ११.३० वाजता डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. मिरवणुकीत सुरवातीला संघर्ष ढोल ताशा पथक, नंतर श्रीराम पथक , शौर्य ढोल ताशा पथक आणि प्रभात बॅंड आपली सेवा सादर करत आहेत.

गणपती बाप्पा मोरयाच्या गजर करत गणराय थाटात विराजमान होण्यासाठी निघाले आहेत. मानाचा पहिला गणपती विराजमान झाल्यानंतर इतर गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे.

Web Title: The procession of Ganpati, the first Kasba of Mana, begins in jubilation; Installation will be at half past eleven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.