'चिकन खर्डा विथ गार्लिक नान' एकांकिकेने ‘पुरुषोत्तम’ स्पर्धा सुरू होणार

By श्रीकिशन काळे | Published: August 7, 2023 09:28 PM2023-08-07T21:28:01+5:302023-08-07T21:28:09+5:30

स्पर्धा दि.१६ ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

The 'Purushottam' competition will start with the single 'Chicken Kharda with Garlic Naan' play | 'चिकन खर्डा विथ गार्लिक नान' एकांकिकेने ‘पुरुषोत्तम’ स्पर्धा सुरू होणार

'चिकन खर्डा विथ गार्लिक नान' एकांकिकेने ‘पुरुषोत्तम’ स्पर्धा सुरू होणार

googlenewsNext

श्रीकिशन काळे
पुणे :
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८ व्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान' या एकांकिकेने होत असून समारोप सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सुरेल चाललंय आमचं' या एकांकिकेने होणार आहे.

स्पर्धा दि.१६ ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत ५१ संघांचा सहभाग आहे. सोमवारी इंदिरा मोरेश्वर सभागृहात स्पर्धक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे लॉटस् काढण्यात आले. सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर आणि चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्पर्धेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली.

गेल्या वर्षी स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेली अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय, पीडीइए अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट, परांडवाडी, जेएसपीएमएनटीसी, नऱ्हे, डी. वाय पाटील युनिट वन, ताथवडे, भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती ही महाविद्यालये संदाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहेत.

Web Title: The 'Purushottam' competition will start with the single 'Chicken Kharda with Garlic Naan' play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे