SSC Result: राज्यात तब्बल बारा हजार शाळांचा निकाल १०० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 09:24 PM2022-06-17T21:24:06+5:302022-06-17T21:24:14+5:30
राज्यात एकूण २२ हजार ९२१ शाळांपैकी १२ हजार २१० माध्यमिक शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे
पुणे : राज्यात एकूण २२ हजार ९२१ शाळांपैकी १२ हजार २१० माध्यमिक शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. याची टक्केवारी ५३ इतकी आहे, तर २० ते ३० टक्केवारी असलेल्या राज्यात केवळ चार शाळा आहेत.
राज्यातील एकूण नऊ विभागांपैकी मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ५६९ शाळा आहेत. त्याखालाेखाल पुण्यात ३५६९ शाळा असून, सर्वात कमी शाळा काेकण विभागात आहेत. त्यांची संख्या ६३९ इतकी आहे. इतर विभागात एक ते दाेन हजारांच्यादरम्यान शाळा आहेत. एकूण विभागातील सुमारे २३ हजार शाळांपैकी ५३ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के आहे, तर, ९० ते ९९.९९ टक्के मिळवलेल्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ असून, त्यांची टक्केवारी ३८.४० इतकी आहे.
निकालांच्या टक्केवारीनुसार शाळांची संख्या
विभाग एकूण शाळा १०० टक्के विद्यार्थी पास झालेल्या शाळांची संख्या
पुणे - ३५६९ २०४२
नागपूर - २७३४ १४३३
औरंगाबाद - २६२६ ११७२
मुंबई - ३८११ १९६५
काेल्हापूर - २३०८ १६४९
अमरावती - २६६३ १२६८
नाशिक - २७७० ११८२
लातूर - १८०१ ९६०
काेकण - ६३९ ५३९
एकूण - २२,९२१ १२,२१०
टक्केवारी - ५३.२७