महिलांनी मारहाण केल्याने रिक्षाचालकाने खाणीत उडी मारली

By विवेक भुसे | Published: March 26, 2023 05:01 PM2023-03-26T17:01:08+5:302023-03-26T17:01:44+5:30

गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्याने अपमान झाल्याच्या रागातून रिक्षाचालकाने खाणीत उडी मारुन आत्महत्या

The rickshaw pullers jumped into the mine after being beaten by the women | महिलांनी मारहाण केल्याने रिक्षाचालकाने खाणीत उडी मारली

महिलांनी मारहाण केल्याने रिक्षाचालकाने खाणीत उडी मारली

googlenewsNext

पुणे : दारु पिऊन घराच्या दारात शिवीगाळ केल्याने शेजारी राहणाऱ्यांनी घरात शिरुन मारहाण केली. गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्याने अपमान झाल्याच्या रागातून रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारुन आत्महत्या केली.

अजय शिवाजी टिंगरे (वय ४२, रा. धानोरी गाव) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी अश्विनी टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय टिंगरे हा २३ मार्च रोजी रात्री दारु पिऊन आला. घरासमोर उभे राहून शिवीगाळ करु लागला. तेव्हा शेजारी राहणाऱ्यांनी अश्विनी टिंगरे यांना पतीला समजाव. ११२ ला कॉल केल्यावर पोलीस आले. त्यांनी अजय याला समज दिल्यावर तो घरात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांनी झोपेत असलेल्या अजयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत घराबाहेर आणले. फिर्यादी यांनी नवनाथ टिंगरे यांना त्याला मारु नका अशी विनवणी केली. तेव्हा त्यांनी तो मार खाण्याच्या लायकीचाच आहे, मारा, असे सांगितले. लोक जमा होऊ लागल्याने मारहाण करणारे शेजारचे निघून गेले.

त्यानंतर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाल्या. दरम्यान अजय टिंगरे हा मोपेड घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग त्यांची मुलगी व सोमा गेरंम हे गेले. गावात महिलांनी मारहाण केल्यामुळे मनाला संताप होऊन अपमानित झाल्याने अजय टिंगरे हा विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खदानीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सोमा गोरंम यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने हात झटकून स्वत: खाणीत उडी मारली. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The rickshaw pullers jumped into the mine after being beaten by the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.