महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा - रूपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:32 PM2022-08-22T16:32:15+5:302022-08-22T16:32:25+5:30

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत.

The root of violence against women is superstition in the society Rupali Chakankar | महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा - रूपाली चाकणकर

महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा - रूपाली चाकणकर

googlenewsNext

धायरी : पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती , सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती , सासू , सासरे यांना अटक झाली होती. तर आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे. तसेच 
या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.  

हे समूळ नष्ट करणे ही तुमची , आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी असून  या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.  अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे  व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता आहे.  महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी ह्याची गंभीर दखल घेतली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण अशा मुद्द्यांवर जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The root of violence against women is superstition in the society Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.