"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:40 PM2023-10-12T23:40:22+5:302023-10-12T23:40:54+5:30

नव्याने गठित झालेल्या चौकशी समितीच्या निवडीवर आमदार रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

The Sassoon Inquiry Committee is not satisfactory says MLA Ravindra Dhangekar | "ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?"

"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?"

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणच्या चौकशीत वैद्यकीय शिक्षण विभागातीलच समकक्ष अधिकारी नेमल्याने या समितीवर कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. निवृत्त न्यायधिशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बुधवारी ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या व त्यानंतर घडलेल्या घडामोडी संदर्भात एक पत्र काढून चौकशी समिती नेमली आहे। या समिती मधे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.या समिती मधे एक अधिष्टता व दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील ने  पलायन केल्यानंतर ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला.देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशी साठी समिती गठित केली आहे.परंतु ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स असून या मधून काहीही साध्य होणार नाही असे धंगेकर यांनी मुखमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 हे अतिशय गंभीर प्रकरण असून या मध्ये अनेक बडे मासे गुतले आहेत.ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या आशीर्वादाने ललित पाटील अनेक दिवस ससून रुग्णालयाचा पाहुंचार घेत होता.या ठिकाणहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यामुळे या प्रकरणात दोषी डॉक्टरावर ही चौकशी समिती कारवाई करू शकणार नाही. त्किंबहुना या डॉक्टरांना वाचवण्याचे काम ही समिती करू शकते. त्यामुळे हा प्रकरणाच्या चौकशी साठी निवृत्त न्यायाधिशच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करावी अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्याकडे केली.

Web Title: The Sassoon Inquiry Committee is not satisfactory says MLA Ravindra Dhangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.