इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:02 PM2024-08-26T17:02:10+5:302024-08-26T17:03:16+5:30

महिलेने रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली

The search for the dead body of the woman police officer who jumped into the Indrayani river begins; The cause of suicide is also in the bouquet | इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात

इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात

आळंदी : आळंदीतील इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.
           
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली आहे.
           
अनुष्का केदार पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. मागील दोन दिवसांपासून त्या नोकरीवर गेल्या नव्हत्या. रविवारी सर्वजण घरी होते. दुपारी घरातील सदस्य झोपी गेले असता अनुष्का घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने घरच्यांना अनुष्का यांनी इंद्रायणी नदीत उडी मारल्याची माहिती मिळाली. अनुष्का यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कुटुंबियांना काहीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आळंदी पोलिसांकडून आळंदीपासून गोलेगाव पर्यंतच्या हद्दीत शोध घेतला जात आहे. त्यापुढे पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरु होत असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना शोध घेण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून उजनी धरणापर्यंत असलेल्या पोलीस ठाण्यांना शोध घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

आळंदी पोलिसांकडून दिवसभर शोध सुरु

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी सायंकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी (दि. २६) पुन्हा आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु आहे.

Web Title: The search for the dead body of the woman police officer who jumped into the Indrayani river begins; The cause of suicide is also in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.