भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:25 PM2022-08-22T19:25:26+5:302022-08-22T19:26:04+5:30

भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

The shock death of a scavenger who supported his family Unfortunate incident in Pune | भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

googlenewsNext

धायरी : वडगाव खुर्द येथील हजार किलो व्हॅटच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. शफीक बशीर कुरेशी (वय-३९, रा-शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर पुणे) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी घडली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीक कुरेशी हे दररोज भंगार गोळा करून उदरनिर्वाह करीत असत. १२ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी व पत्नीसह ते हडपसर परिसरात राहत होते. सोमवारी सकाळी ते हडपसरमधून भंगार गोळा करण्यासाठी वडगाव खुर्द परिसरात आले होते. भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी माहिती देताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता परिसरात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत....

''वडगाव - धायरी भागात बऱ्याच ठिकाणी फिडर बॉक्स हे उघड्या अवस्थेत आहेत. काही फिडर बॉक्सचे दरवाजे गायब आहेत.  महावितरण विभागाने उघडे असणारे फिडर बॉक्स सुस्थितीत केले पाहिजे. - माधुरी शिवाजी चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या'' 

 

Web Title: The shock death of a scavenger who supported his family Unfortunate incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.