पाणी आणि रस्त्यासाठी थ्री ज्वेल्स सोसायटीच्या नागरिकांचा मूक आक्रोश
By राजू इनामदार | Published: June 4, 2023 05:58 PM2023-06-04T17:58:16+5:302023-06-04T17:59:28+5:30
रस्त्यावरील खड्ड्यांचे केले सामुहिक पूजन
राजू इनामदार, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: गेल्या सात वर्षांपासून अनेकदा मागण्या करुनही कात्रज कोंढवा रस्ता, इस्कॉन मंदिर ते येवलेवाडी रस्ता होत नाही. लाखो रुपये भरुन लोकांनी घरे घेतली पण ना रस्ता सुरळीत ना पाणी! त्यामुळे टिळेकरनगर मधील थ्री ज्वेल्स सोसायटी व परिसरातील लोकांनी रविवारी सकाळीच सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून आराध्यम सोसायटीपर्यत पायी मुक निदर्शने केली.
मागण्यांचे फलक हातात घेऊन सोसायटीतील.नागरिकांनी पायी जात मुक निदर्शने केली. रस्त्यांवरच्या खड्ड्याचे सामुहिक पूजन केले. महापालिका जास्तीचा कर वसुल करते पण सुविधा मात्र कोणत्याही देत नाही. रस्ता, पाणी या मुलभूत सुविधाही मिळायला तयार नाही. दिवसभर काम करायचे, कर देऊन महापालिकेचा कर भरायचा व स्वतःच्या घरात सुखाचे दोन तासही काढता येत नाहीत, सतत पाणी नसण्याचा त्रास, घरातून बाहेर.पडायचे तर.खड्ड्यांचा त्रास त्यामुळे या भगातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सोसायटीतील बऱ्याच लोकांकडून ४० टक्के कर जादा घेतला जातो. तो वेळेवर दिला नाही तर लगेच नोटिसा येतात. रोजचे जगणेही महापालिकेने महाग केले आहे अशा भावना प्रताप पाटील, पांडुरंग भोळे ,अमित पुंगालिया ,अविनाश हिंगमीरे, अभिजीत शाह, विनित अमृतकर, सागर देशपांडे या नागरिकांनी व्यक्त केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींही याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्याकडे जाऊनही काही उपयोग नाही असे काही नागरिकांनी सांगितले.
सोसायटीतील परिसरातीलही नागरिक मोठ्या संख्येंने या आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्यावर येऊनही त्याची दखल घेतली नाही तर आता यापेक्षा वेगळे व तीव्र आंदोलन.केले जाईल, त्याला जबाबदार महापालिका असेल असा इशारा नागरिकांनी दिला.