प्रशासनाची स्टील फ्रेम गंजलेली! पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

By श्रीकिशन काळे | Published: January 2, 2024 09:33 PM2024-01-02T21:33:48+5:302024-01-02T21:33:57+5:30

शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ पुस्तकाचे प्रकाशन

The steel frame of the administration is rusted! Prithviraj Chavan's regret | प्रशासनाची स्टील फ्रेम गंजलेली! पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

प्रशासनाची स्टील फ्रेम गंजलेली! पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

पुणे: ‘‘पूर्वी प्रशासनाला लोकशाहीचे, समाजाचे ‘स्टील फ्रेम’ समजले जायचे. परंतु, आता ही ‘स्टील फ्रेम’ गंजलेले आहे, अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हे चिंताजनक आहे. त्यात बदल व्हायला हवा,’’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२) झाले. तसेच महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित ‘सुप्रशासन’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर, जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, माजी वनाधिकारी सत्यजीत गुजर, माजी भुजल संचालक चिंतामणी जोशी, माजी वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, अरविंद पाटकर, चेतना नंदकर आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, प्रशासनात काम करताना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांचे किस्से यात आहेत. अनेक इरसाल माणसं भेटली. ही माणसं जर स्वातंत्र्यानंतर परदेशातील प्रत्येक देशात पाठवली तर त्यांची आर्थिक स्थिती आज नक्कीच खाली आली असती. अशा व्यक्तींमुळे मला पुस्तक लिहिता आले. हे देखील खरंय!’’

हे राहिले !
मी मुख्यमंत्री असताना ‘यशदा’ संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार होता. परंतु, ते होऊ शकले नाही. ते झाली पाहिजे होते. कारण तिथे जर कोणाला नियोजनाचे काम शिकायचे असेल, तर शिकू द्यावे. कोणाला धोरणकर्ता म्हणून काम शिकायचे असेल तर ते शिकता येईल,’’ असे चव्हाण म्हणाले.

हे केले !

महाराष्ट्रात आजही नरबळी दिले जातात. हे अत्यंत दुदैवी आहे. एका महिन्याला एक नर बळी दिला जातो. ही २०१४ ची आकडेवारी आहे. त्यावर आम्ही तेव्हा कायदा करणार होतो. पण त्याला विरोध झाला. दारू बंदीचा कायदा करणार होतो, तो यशस्वी झाला नाही. परंतु, अंधश्रद्धेचा कायदा करता आला याचे समाधान आहे, असे चव्हाण म्हणाले.

ही खंत !
आमच्या सरकारने गुटखा बंदीचा कायदा केला. पण आज मोठमोठे फिल्मस्टार त्याची जाहिरात करतात. त्यात विलायची असल्याचे सांगून जाहीरात केली जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: The steel frame of the administration is rusted! Prithviraj Chavan's regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.