स्टेरिंग खराब..., चावीही तुटली..., तरुणीने माघार न घेता पटकावला तिसरा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:05 PM2023-01-24T15:05:05+5:302023-01-24T15:05:13+5:30

भारतात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये दिग्गज अनुभवी स्पर्धक सहभागी असताना नवख्या तरुणीने प्रत्येक स्पर्धेत आपली चमक दाखवली

The steering is bad..., the key is also broken..., the girl won the third position without backing down | स्टेरिंग खराब..., चावीही तुटली..., तरुणीने माघार न घेता पटकावला तिसरा क्रमांक

स्टेरिंग खराब..., चावीही तुटली..., तरुणीने माघार न घेता पटकावला तिसरा क्रमांक

Next

पुणे: कोहिमा, नागालँड येथे झालेल्या INRC कार रॅलीच्या स्पर्धेत पुण्याच्या निकिता टकले - खडसरे ने चांगला परफॉर्मन्स दाखवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत स्टेरिंग खराब होऊनही व चावी तुटूनही माघार न घेता निकिता टकले - खडसरे ने चांगला परफॉर्मन्स दाखवला. निकिता पुण्यातील हडपसर परिसरात शेवाळेवाडी येथे राहते. 

नागालँडमध्ये अखंड दृढतेसह अनुभवी चालक चेतन शिवरामने पहिला क्रमांक पटकावला आणि तो आणि INRC 2 श्रेणीतील शोडाउनमध्ये एकूण रॅलीत दुसरा-सर्वोत्तम ठरला. कोहिमा येथे अर्णव प्रताप सिंग अव्वल ठरला जेआयएनआरसी श्रेणीत त्याने पोडियम आणि दुसरा क्रमांक पटकावला. निकिता टकले खडसरेने ज्युनिअर इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (JINRC) मध्ये तिसरा क्रमांक पटकाविला.

थंडीच्या वातावरणात स्पर्धेकांना रॅलीत आव्हान....

नागालँड कोहिमा येथे झालेल्या रॅलीत स्पर्धेकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, यामध्ये कडाक्याची थंडी, त्यात इंजिन समस्यांमुळे गाड्या सुरु झाल्या नाहीत. धुके असल्याने पहिल्याच दिवशी दहा स्पर्धक रॅलीतून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी साधारण सुमारे अठ्ठावीस स्पर्धक सहभागी झाले. या रॅलीत भारतातून सुमारे 70 कार रॅली स्पर्धक सहभागी झाले होते. परंतु अनेकांना अडचणी आल्याने सहभागी होऊ शकले नाहीत. रॅलीचे आयोजन नागालँड ऍडव्हेंचर क्लबने केले होते.

नवखी असताना दिग्गज खेळाडूंपुढे निकिताचे अनोखे यश....

निकिता टकले - खडसरेने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षापासून कार रॅलीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच भारतात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये दिग्गज अनुभवी स्पर्धक सहभागी असताना नवख्या निकिताने प्रत्येक स्पर्धेत आपली चमक दाखवली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते. यावर्षी निकिता इंडियन नॅशनल आटो क्रॉस चॅम्पियनशिप सह सहा ते सात रॅली मध्ये सहभागी होणार आहे. आगामी स्पर्धेत भारत व परदेशात होणाऱ्या रॅलीत यश मिळविण्याचा संकल्प निकिताने व्यक्त केला आहे. 

Web Title: The steering is bad..., the key is also broken..., the girl won the third position without backing down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.