पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:28 PM2024-08-22T19:28:21+5:302024-08-22T19:28:54+5:30
एमपीएससी विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण केली तर कृषी विभागासंबंधित मागणीचा काहीच विचार न केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले होते
पुणे: पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांची एक मागणी पूर्ण केली. कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. २०२४ च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्वपरीक्षा घ्यावी अशा मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा आंदोलनावर ठाम राहिले होते. अशातच पुणेपोलिससांकडून विदयार्थ्यांना धरपकड झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सर्व आंदोलक विदयार्थी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं आहे. एकूण सहा जणांना नोटीस आणि समज देण्यात आला आहे.
आंदोलकांची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होत. आता मुलं पुन्हा पुन्हा आंदोलनाला बसत आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही ते ऐकत नसल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं असल्याचे पोलिसांनी सांगितलं होत. अखेर त्यांना समाज आणि नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.
या आंदोलनाला काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, तसंच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. रोहित पवार हे रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होते. तसंच राज्य सरकारने या आंदोलनावर तोडगा न काढल्यास मी देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. तसेच आज सायंकाळपर्यंत रोहित पवार विद्यार्थ्यांबरोबरच होते.