Navale Bridge Accident: 'ट्रकचे ब्रेक फेल झालेच नव्हते'; नवले ब्रिज अपघातप्रकरणी मोठी माहिती हाती, चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:01 PM2022-11-21T13:01:44+5:302022-11-21T13:06:02+5:30
Navale Bridge Accident: सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत.
सातारा-मुंबई महामार्गावर नऱ्हे स्मशानभूमीवरील बाजूला असलेल्या सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने एका पाठोपाठ ४८ वाहनांना उडविले. ही दुर्घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणाचाही बळी गेला नाही. मात्र दहा जण जखमी झाले आहेत. या भरधाव ट्रकने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४८ हून अधिक वाहने चिरडली.
सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ट्रकचे ब्रेक व्यवस्थित होते. फेल झाले नव्हते, असं तपासात समोर आलं आहे. तसेच ट्रकचा चालक फरार झाला आहे. त्यामुळे अजूनही या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे.
Navale Bridge Accident: व्हिडीओ गेमप्रमाणे गाडी चक्क हवेत उडाली!
पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्त प्रवासी विनायक शिरमे यांनी हा भयानक अनुभव ‘लोकमत’ला सांगिताला. ते म्हणाले की, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या वॅॅगनआर माेटारला जोरात धडक दिली. यात माझी गाडी हवेत उडाली आणि सात-आठ फूट लांब जाऊन् पडली. गाडी पुन्हा उभीच खाली पडल्याने आणि सीटबेल्ट बांधलेले असल्याने गाडीतील आम्हा दाेघांना जास्त मार लागला नाही. आम्ही खाली उतरेपर्यंत ट्रक पुढे आणखी काही वाहनांना उडवत लांबपर्यंत गेला होता. मागच्या सीटवर माझे बाबा बसले होते. यात त्यांच्या मानेला दुखापत झाली, मी स्वत: वाहन चालवत होतो, माझ्या पायाला दुखापत झाली, असं सांगितलं.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने उलटी-सुलटी पडली असल्याने रस्त्यावर पेट्रोल, डिझेल आणि ऑईलचे पाट वाहत होते, तर कार्सचे बॉनेट, बंपर, व्हीलकव्हर यासह कांचाचा खच पडला होता. यासाठी अग्निशामक दलाने रासायनिक साबणाच्या फेस रस्तावर टाकन रस्ता धऊन काढला.
ट्रक की यमदूत? नऱ्हे येथे ४८ वाहनांना उडविले; ऑईल, डिझेल अन् काचांचा खच https://t.co/NZKqfhPR7M
— Lokmat (@lokmat) November 21, 2022
पोलीस तत्काळ हजर-
सुमारे दहा मिनिटांमध्ये पोलिस आणि रुग्णवाहिका आल्या. त्यांनी मदत देऊ केली. तोपर्यंत माझ्या नोतवाईकाना, कुटुंबियांना आम्ही बोलावले होते. ते ही घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने आम्ही ट्रकजवळ गेलो तेव्हा ट्रकचाकल पळून गेल्याचे सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"