Accident: हातावर पोट असणाऱ्या मजूर अन् भिक्षेकरीचा दुर्दैवी मृत्यू; रेल्वे अपघातात गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 02:33 PM2022-05-24T14:33:06+5:302022-05-24T14:33:19+5:30

लोणी रेल्वे स्थानकात रेल्वेच्या धडकेमुळे एक तर रेल्वेतून खाली पडल्यामुळे एक असे दोनजण मृत्यूमुखी पडले आहेत

The unfortunate death of a beggar with a stomach on his hands; Life lost in a train accident | Accident: हातावर पोट असणाऱ्या मजूर अन् भिक्षेकरीचा दुर्दैवी मृत्यू; रेल्वे अपघातात गमावला जीव

Accident: हातावर पोट असणाऱ्या मजूर अन् भिक्षेकरीचा दुर्दैवी मृत्यू; रेल्वे अपघातात गमावला जीव

googlenewsNext

लोणी काळभोर : लोणी रेल्वे स्थानकात रेल्वेच्या धडकेमुळे एक तर रेल्वेतून खाली पडल्यामुळे एक असे दोनजण मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे. सदर घटना आज मंगळवार (२४ मे) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात चंद्रकांत शनीचर चव्हाण (अंदाजे वय ५०, रा. राहिंज वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि राम पुकार (वय २२, रा. बिहार) हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत चव्हाण हे मानसिक रूग्ण असून लोणी काळभोर परिसरात त्यांना बाबा दोन रूपये म्हणून ओळखले जाते. ते  सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोणी स्थानकांतील रेल्वे लाईन ओलांडून सिमेंट धक्क्याकडे निघाले होते. त्यावेळी दौंडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हैद्राबाद एक्सप्रेसची धडक चव्हाण यांना बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना घडल्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघालेल्या जेसीडी एक्सप्रेस मधून राम पुकार हा तरूण दरवाजातून खाली पडला. त्याचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत चव्हाण हे लोणी काळभोर परिसरात बाबा दोन रूपये म्हणून भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते. तर राम पुकार हा मजूर कामासाठी पुण्याला आला होता. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

Web Title: The unfortunate death of a beggar with a stomach on his hands; Life lost in a train accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.