'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 09:35 AM2022-04-16T09:35:09+5:302022-04-16T09:41:51+5:30

विशेष म्हणजे राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून आज हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहेत

The voice of the constitution is more sacred than 'Bhonga', loudspeaker, the opinion of the former convention president sripal sabnis | 'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

Next

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. त्यावरुन, गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. राज ठाकरेंच्या या विधानावरुन त्यांच्यावर टिकेची झोड उठविण्यात आली. मात्र, मनसे नेत्यांकडून याचं समर्थन करण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखल दिला जात आहे. आता, याबाबत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबणीस यांनी भूमिका मांडली आहे.  

विशेष म्हणजे राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून आज हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहेत. येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यास उत्त देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हनुमान जयंतीचा प्रसाद खावून मुस्लिम समुदायाकडून रोजा सोडण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीपाल सबनीस हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे.

''भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका आणि धर्माला बदनाम करु नका. संविधानाची वाटणी आणि फाळणी करु नका. भोंग्याच्या आवाजापेक्षा मला संविधांनाचा आवाज पवित्र वाटतो. हे आपल्या देशाला परवडणारे नाही,'' असे परखड मत सबनीस यांनी पुण्यातील या कार्यक्रमात मांडले. तसेच, ''अशा एकात्मतेचे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. गेल्या ३५ वर्षापासून ही परंपरा चालू आहे. भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी याचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारचे प्रयोग राजकीय स्तरावर करावेत. त्यामुळे राजकारण, धर्मकारण शुद्ध होईल आणि तिरंगा आनंदाने फडकेल,'' असेही सबनीस यांनी म्हटले

दरम्यान, पुण्यातील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वस्तांमार्फत रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती,गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या आतील बाजूस पीर दर्गा आहे.या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले. या कार्यक्रमाला साहित्यिक श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
 

Web Title: The voice of the constitution is more sacred than 'Bhonga', loudspeaker, the opinion of the former convention president sripal sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.