जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

By नितीन चौधरी | Published: November 6, 2023 04:43 PM2023-11-06T16:43:41+5:302023-11-06T16:44:23+5:30

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ विविध प्रकारचे कागदपत्रे तपासण्यात येणार

The work of finding Kunbi records in the district should be done on a war footing: Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh | जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे : “मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी तालुका स्तरावरही समित्यांची स्थापन करण्यात आली असून याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्यात न्या. शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावेत,” असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठकीते ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच महापालिका, सहकार विभाग, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, “कुणबी नोंदी शोधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याने अनुसरलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी व त्याच पद्धतीने विविध विवरणपत्रात अहवाल सादर करावा. १९४८ पूर्वीची आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदींची माहिती देण्यात यावी. नोंदी घेण्यासाठी तालुका स्तरावरही समित्यांची स्थापन करण्यात आली असून याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. याचा अहवाल दर आठवड्यात न्या. शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे.”

बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे, प्रमाणपत्र देताना अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते. १३ प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी करावयाची आहे. तपासलेल्या नोंदींची माहिती संकेतस्थळावर टाकून न्या. शिंदे समितीलाही पाठवायची आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मागासवर्गीय आयोगाकडून माहिती मागविल्यास तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियंत्रण कक्षात संबंधित विभागांनी एक अधिकारी तालुक्याशी समन्वय करण्यासाठी नियुक्त करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

तेरा प्रकारची कागदपत्रे तपासण्यात येणार

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ विविध प्रकारचे कागदपत्रे तपासण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर १९५१, नमुना क्र. १ हक्क नोंद पत्रक, नमुना क्र. २ हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेख तपासण्यात येणार आहेत.

Web Title: The work of finding Kunbi records in the district should be done on a war footing: Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.