HSC / 12th Exam: राज्यात उद्यापासून १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु; यंदा १४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:47 PM2023-02-20T12:47:36+5:302023-02-20T12:47:50+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण

The written examination of the 12th students will begin in the state from tomorrow; This year 14 lakh students will give the exam | HSC / 12th Exam: राज्यात उद्यापासून १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु; यंदा १४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

HSC / 12th Exam: राज्यात उद्यापासून १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु; यंदा १४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

Next

पुणे : राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार असून ही आत्तापर्यंत ची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे. 

राज्यातील ३१९५ मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. मुलींची ६,६४,४६१ इतकी संख्या तर मुलांची संख्या ७ लाखांवर आहे. यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर भरारी पथक आणि बैठी पथक असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी १० मिनिट वाढवून देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्स चे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना जी पी एस लावण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा १२विचा प्रॅक्टिकल पार पडले आहे. कुठलेही कॉलेज राहिले असतील तर थेरी नंतर प्रॅक्टिकल देता येणार आहेत. 

Web Title: The written examination of the 12th students will begin in the state from tomorrow; This year 14 lakh students will give the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.