'आपलं प्रेमप्रकरण तुझ्या घरी सांगेन', भिती दाखवून अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:49 PM2022-03-13T15:49:52+5:302022-03-13T15:53:06+5:30

मैत्रीची माहिती मिळाल्यावर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा प्रकार समोर

The young man tricked the minor girl into showing fear | 'आपलं प्रेमप्रकरण तुझ्या घरी सांगेन', भिती दाखवून अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुबाडले

'आपलं प्रेमप्रकरण तुझ्या घरी सांगेन', भिती दाखवून अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुबाडले

Next

पुणे : अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भिती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करुन लुबाडले. त्यााच्या मैत्रीची माहिती मिळाल्यावर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ऋतीक अशोक दिघे (वय १९, रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली आहे. सार्थक नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनंदनगर येथे राहणार्‍या एका १७ वर्षाच्या मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील एका १७ वर्षाच्या मुलीसोबत ऋतीक दिघे याने जवळीक साधून मैत्री केली. त्यानंतर तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्या दोघांचे रिलेशन घरी सांगेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे तो वेळोवेळी पैसे मागू लागला. तिच्याकडून त्याने आतापर्यंत ७ हजार ५०० रुपये लुबाडले. त्यानंतर त्याने डिसेंबर २०२१ मध्ये तिला खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर, हातावर किस करुन तिचा विनयभंग केला. या दोघांच्या रिलेशनची माहिती सार्थक याला मिळाली. तेव्हा त्याने या मुलीला तू रिलेशनमध्ये ये, नाही तर ऋतीक व तुझे संबंधाबाबत तुझ्या आईवडिलांना सांगेल, अशी धमकी दिली. तिच्याकडे पैशाची मागणी करुन ५०० रुपये घेतले. आपल्या मुलीला वारंवार अधिक पैशाची गरज का भासते, याची चौकशी केल्यावर या मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: The young man tricked the minor girl into showing fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.