मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:34 AM2023-03-08T09:34:28+5:302023-03-08T09:42:09+5:30

जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार

The young woman will travel the world in a Marathmola dress and wearing a nine-vari saree | मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

googlenewsNext

पुणे : पुण्याची ख्याती जगभर पसरलेली आहे, त्यात आणखीन एक मानाचा तुरा लावण्यासाठी मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरीमहिला रमिला लटपटे दुचाकीवरून जगभ्रमंतीसाठी ९ मार्चला निघणार आहे. सुमारे ३६५ दिवस प्रवास करून ८ मार्च २०२४ रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.

यासंदर्भात रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करणार आहे तसेच महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे.

तिने ‘रमा’ (रायजिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार रमिला लटपटे ९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्विनी जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.

तसेच महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच या जगभ्रमंतीचा बेत केला आहे. काही दिवसांपूर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती, या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केले होते. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.

Web Title: The young woman will travel the world in a Marathmola dress and wearing a nine-vari saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.