मृत्युपश्चातही कलाकार उपेक्षितच : शरद तळवलकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाट्य वर्तुळाला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 08:37 PM2018-11-05T20:37:01+5:302018-11-05T20:38:25+5:30

शरद तळवलकर हे असेच एक झाकोळले गेलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 नोव्हेंबरला सांगता झाली.

Theater Circle Forget actor Sharad Talwalkar's Birth Centenary Year | मृत्युपश्चातही कलाकार उपेक्षितच : शरद तळवलकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाट्य वर्तुळाला विसर

मृत्युपश्चातही कलाकार उपेक्षितच : शरद तळवलकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाट्य वर्तुळाला विसर

googlenewsNext

नम्रता फडणीस
पुणे :  महाराष्ट्रातील रसिकांच्या चेह-यावर हास्याची लेकर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा पडलेला विसर,
मुलुंडच्या नाट्य संमेलनात प्रसाद सावरकर यांना जिवंतपणी वाहाण्यात आलेली श्रद्धांजली..रंगभूमीसाठी आयुष्य समर्पित करणा-या पडद्यामागील
कलाकारांच्या वाट्याला मृत्यूपश्चात्य येणारी ‘उपेक्षा’ यांसारख्या घटनांना रंगकर्मींच्या माहिती संकलनाचा अभाव ही गोष्ट प्रकर्षाने कारणीभूत ठरत आहे. इतक्या वर्षांमध्ये रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन करण्यासंबंधी मध्यवर्ती नाट्य परिषदेसह इतर शाखांनी गांभीर्याने कोणतीच पावले उचलली नसल्यामुळे नाट्य वर्तुळामधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. मध्यवर्तीसह परिषदेच्या शाखांकडेही कलाकारांच्या माहितीचा अभाव असल्याचेच बहुतांश वेळेला पाहायला मिळाले आहे.  कलाकारांच्या माहितीचे संकलन ही आता काळाची गरज बनलेली असतानाही मध्यवर्तीने अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या दुर्लक्षिततेमुळे अनेक रंगकर्मींचे  योगदान समाजापर्यंत पोहोचू शकलेले नाही.

                     शरद तळवलकर हे असेच एक झाकोळले गेलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 नोव्हेंबरला सांगता झाली.  मात्र त्याचा
मध्यवर्ती नाट्य परिषदेला पत्ता देखील लागला नाही. रंगभूमीवरील विष्णूदास भावे या प्रतिष्ठित सन्मानाचे तळवलकर हे मानकरी ठरले होते. मात्र तरीही तळवलकर यांच्याबाबत मध्यवर्तीकडे कोणतीच माहिती उपलब्ध नसणे ही दुर्देवी गोष्ट आहे.   यापूर्वी मध्यवर्तीसह पुणे शाखेने कलाकारांच्या
 मुलाखतीस्वरूपात डॉक्यूमेंटेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत मान्यवर कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन करण्यात आले; मात्र नंतर तो प्रकल्प
काहीसा ठप्पच झाला.  यापुढील काळात तरी रंगकर्मींच्या माहितीचे संकलन करण्यात यावे अशी मागणी नाट्य क्षेत्रामध्ये जोर धरत आहे. दरम्यान, नाट्य परिषद पुणे शाखेच्या नवीन कार्यकारिणीने ही काळाची गरज लक्षात घेऊन ‘कलाकारांची सूची’ तयार केली असून,  रंगभूमी दिनानिमित्त या सूचीचे दि. 15 नोव्हेंबरला प्रकाशन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष दीपक रेगे यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कलाकारांची माहिती संकलित करण्यासंबंधी नक्कीच पावले उचलली जातील

पूर्वी मध्यवर्तीने 25 ते 30 कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन केलेले होते. मुळातच शरद तळवलकर यांची जन्मशताब्दी कुणीच केली नाही, ती संपल्यावर
अनेकांच्या लक्षात आल्या. त्यावेळच्या कलाकारांचा डेटा आज फारसा कुणाकडेच उपलब्ध नाही. पण कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे गरजेचे आहे हे मान्यच आहे. त्यामुळे पुढील काळात कलाकारांची माहिती संकलित करण्यासंबंधी नक्कीच पावले उचलली जातील. 

प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद

कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे हे आवश्यकच
कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे हे आवश्यकच आहे. आम्ही जे कलाकारांचे मेळावे घेतले त्यामध्ये कलाकारांचे नाव, जन्मतारीख, त्यांचे रंगभूमीवरचे
योगदान अशी माहिती भरून घेत आहोत.  शाखेतर्फे 450  कलाकारांची सूची आम्ही तयार केली आहे, रंगभूमी दिनानिमित्त येत्या 15 नोव्हेंबरला ती
प्रकाशित करीत आहोत. त्यादिवशीही कलाकारांना आम्ही माहिती देण्यासंबंधी आवाहन करीत आहोत.

- दीपक रेगे, उपाध्यक्ष, नाट्य परिषद पुणे शाखा

Web Title: Theater Circle Forget actor Sharad Talwalkar's Birth Centenary Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.