थिएटर युनिव्हर्सिटीचे कागदी घोडे

By Admin | Published: November 16, 2014 12:42 AM2014-11-16T00:42:52+5:302014-11-16T00:42:52+5:30

भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनात तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी ‘थिएटर युनिव्हर्सिटी’ स्थापण्याची घोषणा केली

Theater University's Paper Horses | थिएटर युनिव्हर्सिटीचे कागदी घोडे

थिएटर युनिव्हर्सिटीचे कागदी घोडे

googlenewsNext
नम्रता फडणीस ल्ल पुणो 
घोषणोचे केवळ शाब्दिक घोडे नाचवून मोठी स्वप्ने दाखविणो हे तसे राजकारण्यांचे कामच.  पंढरपूरच्या 94व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनात तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी  ‘थिएटर युनिव्हर्सिटी’ स्थापण्याची घोषणा केली खरी; मात्र राज्यात प्रस्थापित झालेल्या नव्या सरकारकडून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार, की  निव्वळ ती घोषणाच ठरणार? हा खरा कळीचा मुद्दा आहे. 
 जिथे पायाच  भक्कम नाही, तिथे थेट कळसालाच हात घालण्याचा  प्रकार आहे. पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्याना सहा कलांचे शिक्षण देण्यात यावे, असे शासकीय धोरण अस्तित्वात असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि बाता मात्र थिएटर युनिव्हर्सिटीच्या मारल्या जात आहेत.  
आजही शैक्षणिक स्तरावर ‘कला’ या  विषयाकडे केवळ पर्यायी म्हणूनच पाहिले जात आहे. त्यामध्ये  ‘चित्रकला’ या विषयाला प्राधान्यक्रम देऊन आमच्या विद्याथ्र्याना  एका तरी कलेचे शिक्षण दिले जात आहे, यावर शाळेचे प्रशासन धन्यता मानते, हे त्यातील विशेष. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणानुसार, नाटय़, नृत्य, चित्र, शिल्प, गायन आणि वादन हे सहा कलाप्रकार विद्याथ्र्याना शिकविणो आवश्यक  आहे. राज्य शासनानेही हे धोरण मान्य केले आहे. कला या विषयासाठी एक समितीही अस्तित्वात आहे. या समितीकडून अभ्यासक्रमही आखला जातो. मात्र, इथर्पयतच  कलेकडे पाहण्याची गांभीर्यता शासनस्तरावर पाहायला मिळते. कलेचे विषय रोजच्या अभ्यासक्रमात शिकविण्याची तशी व्यवस्था नाही आणि यासाठी कलेचे स्वतंत्र शिक्षकही मिळत नाहीत, असे सांगून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. दुसरीकडे मात्र रमणबाग प्रशालेसारख्या शाळा नाटय़कलेला महत्त्व देऊन ‘जाणता राजा’सारखी नाटय़कलाकृती निर्माण करून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचे काम करीत आहेत. या नाटकाची नुकतीच लिम्का बुकमध्ये नोंदही झाली आहे. हा आदर्श प्रत्येक शाळांनी घेणो खरे तर गरजेचे आहे. इंग्रजी माध्यमातील  खासगी विनाअनुदानित शाळांमध्येही विद्याथ्र्याना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपयुक्त विषय म्हणून त्यांच्या कलागुणांना वाव  देण्यासाठी  नाटय़, नृत्य, गायन अशा कला विषयांना आवजरून प्राधान्य दिले जात आहे. मात्र, यासाठी स्वतंत्र कलाशिक्षक नेमावा लागत असल्याने पालकांकडून अतिरिक्त शुल्कही आकारले जात आहे. पारंपरिक नृत्यकलेबरोबर  झुम्बा, वेस्टर्न डान्सचाही काही शाळांनी रोजच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे, ही प्रकर्षाने नोंद करावी अशीच गोष्ट म्हणावी लागेल. 
 
 
नाटय़कलेतून  एकात्मिक, सहज, आनंददायी, कृतिशील शि़क्षण मुलांना देण्याचा प्रयत्न आम्ही  ‘जाणता राजा’मधून केला. शब्द, देहबोली, पाठांतर यांमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला उठाव येतो. अशा कलात्मक शि़क्षणामुळे मुलांचे लक्ष अभ्यासाकडे आपोआपच केंद्रित होण्यास मदत होते. शिक्षक आणि विद्याथ्र्यामध्ये सुदृढ नाते निर्माण होते. नाटय़कलांसारख्या उपक्रमांमधून मुलांमध्ये वेशभूषा तयार करण्यापासून ते विविध साधने स्वत: तयार करण्याचे कौशल्य विकसित होते. कलेचे शिक्षण शाळांमध्ये देण्यासाठी शाळा प्रशासनाची इच्छाशक्ती असणो गरजेचे आहे.                  -  भालचंद्र पुरंदरे
                      मुख्याध्यापक, रमणबाग प्रशाला
 
नाटय़कला म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचाच एक भाग आहे. तो जेवढय़ा व्यापक प्रमाणात शाळांमध्ये शिकविला जाईल, तितका मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास उंचावणार आहे. थिएटर युनिव्हर्सिटी ही संकल्पना चांगली असली, तरी त्याआधी शालेय स्तरावर लक्ष केंद्रित करणो आवश्यक आहे. यासाठीच अभ्यास नाटय़ चळवळ मी सुरू केली आहे. केवळ स्नेहसंमेलनापुरते नव्हे, तर रोज वर्गात एक नाटक बसविले जावे. इतिहास, भूगोल अशा विषयांवर ही नाटके निर्मित केली जावीत. यासाठी शिक्षक आणि विद्याथ्र्याच्या कार्यशाळा घेत आहे. 
- प्रकाश पारखी, 
शासकीय कला समितीचे सदस्य

 

Web Title: Theater University's Paper Horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.