पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:10 PM2019-06-05T14:10:34+5:302019-06-05T14:13:54+5:30

पुणे विमानतळावर दररोज ३० हजाराहून अधिक प्रवासी दररोज करतात, यामुळे येथे कोणत्याही वेळेस गेलं तरी प्रचंड वाहतुक कोंडी असते.

Thefraud with passengers in the name of pick-up charges at Pune airport | पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट 

पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट 

Next
ठळक मुद्देपिकअप चार्जेसच्या नावाखाली ५० ते ३४० रुपयांची वसुलीअपंग, वृध्द, महिला, बालकांचे हाल

पुणे: इंडियन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांनी मार्च २०१९ पासून पुणेविमानतळावर प्रवाशांच्या चार चाकी वाहनांवर कर लावण्यास सुरुवात केली आहे. ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली तीन मिनिटांसाठी ५० रुपये आणि तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास थेट ३४० रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पुणे विमानतळावर दररोज ३० हजाराहून अधिक प्रवासी दररोज करतात, यामुळे येथे कोणत्याही वेळेस गेल तरी प्रचंड वाहतुक कोंडी असते. यामुळे एखादे वाहन तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ उभे राहिल्यास त्वरीत ३४० रुपये दंड वसुल केला जातो. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून पुणेकरांची लूट सुरु आहे.
    याबाबत पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी खासदार गिरीश बापट व इंडियन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीला लेखी पत्र दिले आहे.  पुणे शहर अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर असून, गेल्या १५ वर्षांत शैक्षणिक, आयटी क्षेत्रात झालेल्या विकासामुळे अनेक परदेशी कंपन्या व्यावसायासाठी पिंपरी चिंचवड, भोसरी, नगररोड, नाशिक रोड, सातारा रोड परिसरामध्ये आल्या आहेत. यामुळे शहरामध्ये शिक्षण, व्यवसाय, पर्याटन, वैद्यकीय उपचार आदी विविध कारणांसाठी नियमितपणे  विमान प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे सध्या दररोज तब्बल ३० हजाराहून अधिक प्रवाशी पुणे विमानतळावरून विमान प्रवास करतात. 
    शहरात विमान प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असली तरी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांनी अपेक्षित सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. यामध्ये पुणे श्हरामधून बाहेर जाणारे प्रवासी आणि पुणे हरात येणारे प्रवासी एकाच प्लॅटफॉर्मवर येतात. त्यामुळे एअरपोर्टच्या आता गाडी प्रवेश केल्यानंतर वर्दळीच्या वेळी तीन मिनिटापेक्षा कमी वेळात गाडी बाहेर निघणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधा न देता प्रवाशांकडून ३४० रुपयांचा दंड वसूल करणे बेकायदेशील असल्याचे धेंडे यांनी सांगितले. 
    ---------------------
अपंग, वृध्द, महिला, बालकांचे हाल
एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने पिकअप चार्जेस व दंड वसुुली सुरु केल्यामुळे व्यावसायिक वाहाने गेडच्या आत पिकअप अथवा सोडण्यासाठी येत नाहीत. यामुळे एअरपोर्टच्या गेटपासून गाडी घेण्यासाठी प्रवाशांना ५० ते ६० मीटर चालत बाहेर यावे लागते. यामुळे अपंग व्यक्ती, वृध्द, महिला, बालकांचे प्रचंड हाल होत असून, याबाबत तातडीने उपाय-योजना करण्याची मागणी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली आहे.

Web Title: Thefraud with passengers in the name of pick-up charges at Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.