बीएसएनएलच्या २४ बॅटऱ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:08+5:302021-03-30T04:07:08+5:30

ठेवलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या २४ बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या असल्याची घटना उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत घडली ...

Theft of 24 BSNL batteries | बीएसएनएलच्या २४ बॅटऱ्यांची चोरी

बीएसएनएलच्या २४ बॅटऱ्यांची चोरी

Next

ठेवलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या २४ बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या असल्याची घटना उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

याप्रकरणी टेक्नीशियन अजित रणजित साळुंखे ( वय ३४, सध्या रा. विनायक शिंदे यांचे रूममध्ये, दुगड फार्म जवळ, जैन मंदिर, कात्रज, पुणे. मूळ रा. मु. पो. नेरले, ता. वाळवा, जि.सांगली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: फिर्यादी साळुंखे हे हवेली तालुक्यात येणारे टॉवरच्या देखभालीचे काम पहातात.

बुधवार (१० मार्च ) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साळुंखे यांना कंपनीकडुन बीएसएनएल कंपनीच्या उरुळी देवाची येथील बॅटऱ्या व्यवस्थित काम करीत नसलेचे लक्षात आल्याने त्यांनी त्याबाबत कंपनीस कळवून त्या बॅटऱ्या तेथेच काढून ठेवल्या. त्यानंतर शनिवार ( २७ मार्च ) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना कंपनीकडून फुरसुंगी - १ हा टॉवर पुन्हा शटडाउन झाला असलेबाबत कळवलेने ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचले. व टॉवरची पहाणी केली असता टॉवरच्या खाली असणारी पत्र्याचे शेल्टरचे दाराचे कडीकोयंडा तुटलेला दिसला. म्हणून त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता आतमध्ये काढून ठेवलेल्या बॅटऱ्या दिसल्या नाहीत .त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या चोरी करून चोरून नेल्याची खात्री झाल्यावर कंपनीस कळवून त्यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Theft of 24 BSNL batteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.