घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:00 PM2018-08-30T22:00:50+5:302018-08-30T22:04:36+5:30

निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या आहेत.

theft arrested : 20 crime open | घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड

घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड

Next
ठळक मुद्देपोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने केले जप्त कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा

पुणे :  कुलुपबंद सदनिका हेरून भरदिवसा घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईताला त्याच्या साथीदारासह खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने जप्त केले असून त्याच्याकडून शहरात दाखल असलेले एकूण २० गुन्हे उघडकिस आणले आहेत. 
      निखिल उर्फ माँटी दत्तात्रय कंगणे (वय २४, रा. आनंदनगर, तळेगाव ढमढेरे,ता. शिरूर) त्याचे नाव आहे. तर अमोल रघुनाथ गोपकर (वय २८, रा. भिमशक्तीनगर, स्पाईन रोड,चिखली) असे त्याच्या अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे.    
याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली़. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी अमोल पिलाने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निखिल कंगणे हा साथीदारासह सोन्याचे दागिने विकण्यासाठी हडपसरगाव येथील गांधी चौकात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि निखिल व अमोल यांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहरात हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी तसेच निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने जप्त केले आहेत. निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा केले आहेत. पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती़. त्यानंतर तो तळेगाव ढमढेरे येथे रहायला गेला होता़. त्यामुळे तो पोलिसांच्या नेहमीच्या चेकिंगमध्ये मिळून येत नव्हता़. त्याने चोरलेले दागिने त्याने घरातील बेडच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे, रमेश गरूड, उदय काळभोर, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदिप शिंदे, संतोष मते, सचिन कोकरे, धिरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, शिवानंद बोले, हनुमंत गायकवाड, नारायण बनकर, प्रकाश मगर आदीच्या पथकाने केली.

Web Title: theft arrested : 20 crime open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.