सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:48+5:302021-06-05T04:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : मृत महिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख ...

Theft of ashes and bones to find gold | सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थींची चोरी

सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थींची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : मृत महिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवून नेण्याच्या घटना लोणी काळभोर परिसरात वाढल्या आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत या अस्थिचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही दोन सधन गावे आहेत. कोरोनामुळे तसेच वृद्धापकाळामुळे गेल्या वर्षभरात परिसरातील बरेच नागरिक मृत्युमुखी पडले. लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गाशेजारी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत मरण पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहांची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी या मृतदेहाची राख शेजारील ओढ्यात सोडली जाते. या विधीला सावडणे असे म्हणतात. अस्थी एका मातीच्या मडक्यात गोळा करून त्यांचे एखाद्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणच्या नदीतील पाण्यात विसर्जन केले जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अंत्यसंस्कार ते सावडणे यादरम्यान एक रात्र नक्की असते. या रात्री अंत्यसंस्कार केलेला मृतदेह जर महिलेचा असेल तर स्मशानभूमीतील राख व अस्थी चोरीला जात आहेत. सुरुवातीला चुकून झाले असेल म्हणून नागरिकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले, परंतू आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल तर हा प्रकार सहसा होत नाही. परंतु जर बाहेरगावाहून येऊन येथे राहणाऱ्या कुटुंबातील महिला असेल तर नक्कीच मृतदेहाची राख व अस्थी चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही सधन ग्रामपंचायतींनी या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन लगेचच प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहे. या ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील.

- राजाराम काळभोर, सरपंच, लोणी काळभोर

Web Title: Theft of ashes and bones to find gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.