केतकावळेच्या भैरवनाथाच्या मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:46+5:302021-03-14T04:10:46+5:30
सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या केतकावळे येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ देवाचे दोन व जोगेश्वरी देवीचे दोन ...
सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या केतकावळे येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ देवाचे दोन व जोगेश्वरी देवीचे दोन चांदीचे मुखवटे चोरीस गेले आहेत. अंदाजे अडीच किलो वजनाचे तसेच एक लाख रुपये किमतीच्या मुखवट्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून, सूरज बाठे (रा. केतकावळे, ता. पुरंदर) यांनी चोरीची तक्रार सासवड पोलिसात दाखल केली आहे .
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज कृष्णा बाठे (वय ३१) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुरंदर तालुक्यातील मौजे केतकावळे गावच्या हद्दीतील काळभैरवनाथ मंदिरातील शुक्रवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी १:३० ते रात्री नऊच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी काळ भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याचे लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्यातील काळभैरवनाथ देवाचे दोन व जोगेश्वरी देवीचे दोन चांदीचे मुखवटे किंमत अंदाजे एक लाख रुपये किमतीचे मुखवटे चोरी करून नेले आहेत. पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णा साहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश माने अधिक तपास करत आहेत.