उजनी जलाशयात दिवसाढवळ्या काळ्या सोन्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:26+5:302021-04-22T04:10:26+5:30

पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना परिस्थिती तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र कष्ट ...

Theft of black gold in Ujani reservoir in broad daylight | उजनी जलाशयात दिवसाढवळ्या काळ्या सोन्याची चोरी

उजनी जलाशयात दिवसाढवळ्या काळ्या सोन्याची चोरी

googlenewsNext

पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना परिस्थिती तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहेत. त्याचा खूप मोठा गैरफायदा या वाळू तस्करांनी घेतला असून, उजनी जलाशयात शेकडो बोटी सोडून बेकायदेशीर हजारो ब्रास, करोडो रुपयांची वाळू उपसली जात आहे.

इंदापूर तालुक्यातील शहा, कांदलगाव, माळवाडी नं. २, पडस्थळ या उजनी जलाशयाच्या पट्ट्यात दररोज सायंकाळी ६ ते पहाटे ५ या वेळेत शेकडो वाळूउपसा करणारे फायबर व बोटी चालू असतात. उजनी जलाशयाच्या बॅक वॉटर भागात वाळूच्या शेकडो टन वजन असणाऱ्या वाहनांची रात्रभर वाहतूक चालू असल्याने, बॅकवॉटर भागातील पंधरा वीस गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील बीटचे कर्तव्य करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना हे सगळे अवैध धंदे का दिसत नाहीत, हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.

एकतर संपूर्ण तालुक्यात कोरोना रुग्णंाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, दुसरीकडे कसलेही गांभीर्य नसलेले वाळू तस्कर वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत आहेत. तहसीलदार सोनाली मेटकरी पदावर असताना वाळू तस्करी करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे उजनी जलाशयातून एक पाटीभर वाळू चोरी करण्याचे धाडस कोणी करत नव्हते.

मात्र इंदापूर तालुक्यात पोलीस प्रशासनाचे मोठे अधिकारीपद व महसूलच्या प्रमुखपदी प्रभारी अधिकारी आल्यापासून, वाळू तस्करी करणारे व दोन नंबरचे अवैध व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या चोरांना व गुन्हेगारांना मोठा आधार मिळाल्यासारखे वाटत आहे.

मोक्काअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची गरज

इंदापूर तालुक्यातील वाळूचोरी, गौणखनिज चोरी, अवैध व बेकायदेशीर धंदे करणारे गुन्हेगार आहेत. तसेच पोलीस प्रशासनाकडे ज्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल होऊनही पुन्हा पुन्हा तेच बेकायदेशीर व अवैद्य धंदे करून पोलीस प्रशासनाला चॅलेंज करीत आहेत. अशा अट्टल गुन्हेगारांवर मोक्का व तडीपार सारखे गुन्हे दाखल करून त्यांना सरळ करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाळूचोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करणार

मागील चार दिवसांपूर्वीच उजनी जलाशयात वाळूउपसा करणारे दोन फायबर व दोन बोटी महसूल प्रशासनाने उद्ध्वस्त केल्या आहेत. कोरोनाच्या काळात संपूर्ण तालुक्याची परिस्थिती हाताळताना आमची प्रचंड धावपळ होत आहे. तरीही आम्ही वाळू तस्करी करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत असे प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

उजनी जलाशयाच्या बॅकवॉटर भागात माळवाडी नं.२ येथे बेकायदेशीर वाळूउपसा करणारी बोट व फायबर यंत्र.

Web Title: Theft of black gold in Ujani reservoir in broad daylight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.