बीआरटीच्या बसथांबे चोरीचे सत्र सुरूच

By admin | Published: December 7, 2014 12:40 AM2014-12-07T00:40:45+5:302014-12-07T00:40:45+5:30

पालिकेने अतिउत्साहात नगररोडवर येरवडा ते खराडी बीआरटी बांधकाम केले. या बीआरटी मार्गावर जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये किंमतीचे नऊ बसथांबे तयार केले.

Theft of buses of BRT has been started | बीआरटीच्या बसथांबे चोरीचे सत्र सुरूच

बीआरटीच्या बसथांबे चोरीचे सत्र सुरूच

Next
चंदननगर : पालिकेने अतिउत्साहात नगररोडवर येरवडा ते खराडी बीआरटी बांधकाम केले. या बीआरटी मार्गावर जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये किंमतीचे नऊ बसथांबे तयार केले. मात्र, बीआरटी सुरू करण्यास अद्याप मुहूर्त सापडला नसल्याने, या मार्गावरील बसथांबे शोभेचे वस्तू झाली आहे. या बसथांब्याचा उपयोग गरिबांसाठी शेल्टर होम, तर मद्यपी व चोरटय़ांसाठी अर्थार्जनासाठी होत आहे. 
गेल्या काही दिवसांतील बसथांब्यांचे संरक्षक कवच, पत्रे, अशा अनेक गोष्टी चोरीला गेल्या आहेत. पुणो-नगर रोडवर सध्या बीआरटीचे काम सुरू आहे. हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. 
बसस्थानकात किमान वीस ते बावीस दिवे बसवण्यात आले आहेत. चोरटय़ांनी हे दिवे लंपास करून व तारांची तोडफोड केली असून, तेही चोरीला गेले आहेत. बस स्थानकातील खुच्र्या, प्लॅस्टिकच्या काचाही तोडून चोरीला गेल्या आहेत. 
नगररस्ता बीआरटीचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे आढळून आले आहे. यातून सर्वसामान्यांच्या पैशाची मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी होत असताना अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत
आहे. बीआरटीच्या अत्याधुनिक बसथांब्यांना कचराकुंडय़ांचे स्वरूप आले आहे.  जनतेचे कोटय़वधी रुपये अशाप्रकारे वाया जात आहे.(वार्ताहर)
 
नगररस्ता बीआरटीच्या झालेल्या अवस्थेबाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असून, बीआरटीची सद्य:स्थिती, परिस्थीत यावर झालेला खर्च, फसलेल्या बीआरटीच्या चौकशीची मागणी करणार आहे.
 -जगदीश मुळीक, 
आमदार, वडगाव शेरी.
 
4बसथांब्यांचे एक-एक भाग चोरीला जात असेल, तर त्याविरोधात प्रशासकीय संबंधित अधिका:यांनी  पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविने आवश्यक आहे. मात्र, दुर्लक्ष होत आहे.

 

Web Title: Theft of buses of BRT has been started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.