डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:35 PM2018-05-21T12:35:29+5:302018-05-21T12:35:29+5:30
इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले.
पुणे : कंपनीच्या सर्व्हरवरील डाटा फाईल्स स्वत:च्या ईमेलवर घेऊन १५ हजार डॉलर्स स्वीकारुन कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली़. याकुब हानिफ शेख (वय २४, रा़. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे़. हा प्रकार कोंढवा येथील सेल लिडर सोल्युशन प्रा़. लिव्हर कंपनीत २ ते १२ डिसेंबर २०१७ दरम्यान घडला़.
याप्रकरणी रोहन मचे (वय ३१, रा़ कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शेख हे सेल लिडर सोेल्युशन कंपनीत चार ते पाच वर्ष काम करत होते़. कंपनीच्या डाटा विक्रीचीजबाबदारी त्यांच्याकडे होती़. या काळात त्यांनी स्वत:च्या डोमेन तयार करुन त्यावर डाटा फाईल्स स्वत:च्या ई मेल आयडीवर पाठविल्याचे मचे यांना आढळून आले़. त्या इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले़. मचे यांच्या तक्रार अर्जावरुन आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन कोंढवा पोलिसांनी शेख याला अटक केली़ आहे. कोंढवा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड अधिक तपास करत आहे.