बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:31 PM2018-06-15T21:31:45+5:302018-06-15T21:31:45+5:30

पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी जकातनाका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई करण्यात आली होती.

theft Four trucks who seized due to illegal sand transport | बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले

बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले

Next
ठळक मुद्देबेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची शक्यता

पुणे : बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले चार ट्रक क्वीन्स गार्डन येथील हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 
याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी गोकुळ भगत (वय ४३) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी जकातनाका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई करण्यात आली होती. वाळूने भरलेले चार ट्रक क्वीन्स गार्डन येथील अल्पबचत संकुल प्रवेशद्वार क्रमांक दोन आणि लगत असलेल्या हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र वाळूने भरलेले चारही ट्रक पळवून नेण्यात आले. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. व्ही. शिंदे करत आहेत. 

Web Title: theft Four trucks who seized due to illegal sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.