उरुळी देवाची येथे चोरी फसली

By admin | Published: March 13, 2016 01:34 AM2016-03-13T01:34:04+5:302016-03-13T01:34:04+5:30

उरुळी देवाची येथे आज पहाटे तीन चोरट्यांनी सोनाराच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा असफल प्रयत्न केला.

Theft of the god of Uruli God | उरुळी देवाची येथे चोरी फसली

उरुळी देवाची येथे चोरी फसली

Next

लोणी काळभोर : उरुळी देवाची येथे आज पहाटे तीन चोरट्यांनी सोनाराच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा असफल प्रयत्न केला. परंतु, शटर उचकटल्याचा आवाज आल्याने रहिवासी जागे झाले. त्यांमुळे चोरट्यांना पलायन करावे लागले. तिघांपैकी एकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या प्रकरणी सराफ दुकानदार मोहसीन नासीर इनामदार (रा. सावली होम्स, उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. स्थानिक नागरिकांकडून पकडलेला चोरटा अभिमान अण्णा जाधव (वय ४८, रा. परांडा, जि. उस्मनाबाद) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार यांचे उरुळी देवाची, अशोकनगर येथे अनमोल ज्वेलर्स हे दुकान आहे. ११ मार्च रोजी त्यांनी सकाळी ११ च्या सुमारास दुकान उघडले. दिवसभर व्यवहार केला व नेहमीप्रमाणे रात्री ८ च्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले.
आज (दि. १२) पहाटे तीनच्या सुमारास ३ चोरट्यांनी या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शटर उचकटल्याचा आवाज आल्याने येथे राहत असलेले अमित भाडळे व इतर रहिवासी जागे झाले. लोक येत आहेत हे पाहून तिघे चोरटे पळून जाऊ लागले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून जाधव याला पकडले; परंतु त्याचे दोन साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. भाडळे यांनी इनामदार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. इनामदार तेथे पोहोचले. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता, लोखंडी शटरचे आतील व बाहेरील कोयंडे तुटलेल्या स्थितीत आढळून आले. मध्यभागी असलेले कुलूप उघडता न आल्याने चोरट्यांना चोरी करता आली नाही. पोलीस हवालदार आर. एल. मोहरकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Theft of the god of Uruli God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.