तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना

By नम्रता फडणीस | Published: August 6, 2024 04:27 PM2024-08-06T16:27:17+5:302024-08-06T16:29:05+5:30

२ लाखांचे दागिने आणि मुखवटे, ८० हजारांचे पूजा साहित्य चोरट्याकडून जप्त करण्यात आले

Theft in as many as 11 temples Thieves caught in police net due to cctv incidents in rural areas of Pune | तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना

तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर , रांजणगाव, खेड भागातील मंदिरातून रक्कम चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी तपास सुरु केला. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर एका सराईत चोरट्याने चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्रापूर परिसरात त्याला सापळा रचून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

 विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरुर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले आहे . मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते. चोरट्याने मध्यरात्री गुन्हे केले. त्याच्याकडून १ लाख ६३ हजारांचे दागिने, एक लाख १७ हजारांचे चांदीचे मुखवटे, ८० हजारांचे पूजा साहित्य जप्त करण्यात आले. चोरीच्या घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सराईत चोरटयाने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना  तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची महिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यावेळी उपस्थित होते.
    
ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, शांताराम सांगडे, रमेश इचके, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, मंगेश थिगळे यांनी ही कारवाई केली, तसेच पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी तपासात सहाय्य केले.

Web Title: Theft in as many as 11 temples Thieves caught in police net due to cctv incidents in rural areas of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.