खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कडूसमध्ये साडेतीन लाखांचे दागिने चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 02:16 PM2021-10-30T14:16:49+5:302021-10-30T14:24:08+5:30
कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांचा बंद घराचा कोयडा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत घरात प्रवेश केला.
राजगुरुनगर: खेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून कडूस येथे चोरट्यांनी घरफोडी करून साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली आहे. तसेच याच परिसरात चोरट्यांनी ४ घरावर डल्ला मारला आहे. याबाबत सोपान सिताराम पानमंद रा. पानमंदवाडी कडुस (ता.खेड )यांनी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे.
कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांचा बंद घराचा कोयडा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत घरात प्रवेश केला. घरातील पत्र्याचे पेटीचे कुलूप तोडुन पेटीतील १ लाख ५ हजार रुपायाचे तिन पदरी सोन्याचे तारेत ओवलेली मोहनमाळ सोन्याचे मोठे मणी असलेले साडेतीन तोळे वजनाची, ७० हजार रुपये किंमतीचा लक्ष्मीहार दोन तोळे वजनाचा, ७० हजार रुपयांची सोनाची भोरमाळ दोन तोळे वजनाची, ७० हजार रूपयांचे सोन्याचे पॅन्डलसह सोन्याची चैन दोन तोळे वजनाची, ३ हजार सोन्याचे तारेत बनविलेली मोत्याची नथ, ९ हजार रुपयांची १५ हजारची रोख रक्कम चोरट्यानी लांबवली.
तसेच पानमंद वस्तीत रहाणारे दत्तु सहादु पानमंद, रामभाउ गणपत पानमंद, रामभाउ गणपत पानमंद, पप्पु मोहन पानमंद याची घरे सुध्दा अज्ञात चोरटयांने फोडली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.