पुणे : एक दोन नव्हे चक्क ४५ दुचाकींची चोरी! दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:29 PM2022-06-10T16:29:00+5:302022-06-10T16:30:32+5:30
साखळी चोरीचेही गुन्हे...
आळेफाटा:पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा तसेच अहमदनगर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद, नवी मुंबई या जिल्ह्यांतूनही गेल्या तीन वर्षापासून दुचाकी वाहने चोरणा-या चार अट्टल चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४५ दुचाकी असा सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.
प्रमोद लक्ष्मण सुरकंडे (वय २६) ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे ( वय २२) गणेश फक्कड कारखिले (वय २३) व आदिल मुक्तार अहमद कुरेशी (वय २१, सर्व रा. निघोज, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गर कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे 29 मे रोजी दुपारच्या सुमारास रस्तालगत उभ्या असलेल्या शांताबाई बबन पावडे यांचे गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेले. बाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. याअनुषंगाने पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास सुरू केला. सिसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील अनोळखी इसम निघोज येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस पथकाने संशयित प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अटक केली.
अटक आरोपी प्रमोद सुरकंडे याचेवर 2021 मध्ये अहमदनगर तोफखाना पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा असल्याचे तपासात उघड झाले. ''पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. झटपट पैसा कमविण्याचे उद्देशाने दुचाकी चोरून त्यांची विक्री करत असत. आळेफाटा पोलिसांनी सर्व 45 दुचाकी वाहने सात दिवसांतच जप्त करून पोलिस ठाण्यात आणली असून त्यांचेकडून आणखी चो-या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर, उपनिरीक्षक रागिनी कराळे, चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, भिमा लोंढे; प्रकाश जढर, लहानू बांगर, अमित माळुंजे, पंकज पारखे, संजय शिंगाडे; पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे; मोहन आनंदगावकर, अशोक फलके यांच्या पथकाने कारवाई केली.