Pune Crime: लष्करी जवानाच्या घरातून दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:44 IST2022-09-27T09:41:26+5:302022-09-27T09:44:10+5:30
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल...

Pune Crime: लष्करी जवानाच्या घरातून दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास
येरवडा : लष्करी जवानाच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ८५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरीच्या घटनेबाबत नायब सुभेदार हेमंतकुमार भरोसाराम वंगवाल (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वंगवाल हे येरवड्यातील आगाखान पॅलेस परिसरातील लष्कराच्या डंकर्स लाइन वसाहतीत राहायला आहेत.
वंगवाल यांच्या तुकडीतील नायब सुभेदार शामल सामंता हे गोवा येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत, तर सामंता यांची पत्नी कोलकाता येथे गेल्या होत्या. त्यामुळे सामंता यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सामंता यांच्या घराचे कुलूप तोडले व कपाटातील दोन लाख ८५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. सामंता यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंगवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.