इंदापूर तालुक्यातील लोणी देवकरच्या ग्रामपंचायत कार्यालयातून रजिस्टर बुकची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 07:46 PM2021-08-11T19:46:43+5:302021-08-11T19:46:50+5:30
अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ग्रामपंचायत कार्यालयातील रजिस्टर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणातील संशयित पोलिसांच्या शोधात असून लवकरच चोरट्याला गजाआड करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोणीदेवकर ग्रामसेवक तुकाराम दिनकर शिंदे (रा.भिगवण,ता.इंदापूर,) यांनी इंदापूर पोलिसांत फीर्याद दिली आहे.
शिंदे हे लोणी देवकर ग्रामपंचायत कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी हजर झाले. त्या अगोदर कार्यालयीन क्लार्क शशिकांत केशव डोंगरे हा कार्यालय उघडून कामकाज करत बसला होता. शिंदेनी त्यांचे काम सुरू केले. त्यावेळी त्यांना ग्रामपंचायत सदस्य संगीता विठ्ठल राखुंडे यांचा फोन आल्याने त्यांना सन २००४ च्या रजिस्टर बुकातील प्रोसिडींगची प्रत हवी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने क्लार्क डोंगरे यांना प्रोसिंडींग बुक आणण्यास सांगितले.
डोंगरे यांना ते बुक शोधूनही सापडले नाही. रविवार ८ ऑगस्ट दुपारी ते सोमवार ९ ऑगस्ट १२:३० वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप उघडून लबाडीच्या इराद्याने कामकाजात त्रास व्हावा. या उद्देशाने १९९८ व २००४ चे रजिस्टर प्रोसिडींग बुकाची चोरी केल्याचे उघडकीस आले. याबाबत इंदापूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.