इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये साडीच्या दुकानात चोरी ; ३५ ते ४० लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:38 PM2019-09-30T14:38:14+5:302019-09-30T14:52:56+5:30

दिवाळीच्या मुहुर्तावर सुरत होलसेल साडी डेपो मधुन झाली चोरी... 

Theft of Rs. 35- 40 lakhs in saree shops at Bhigavan | इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये साडीच्या दुकानात चोरी ; ३५ ते ४० लाखांचा ऐवज लंपास

इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये साडीच्या दुकानात चोरी ; ३५ ते ४० लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext

भिगवण : पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवणमधील सुरत साडी होलसेल डेपोमध्ये चोरी झाली. ही घटना रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.

व्यावसायिक अमोल महादेव धापटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास चोरांनी दुकानात प्रवेश करुन महागड्या साड्यांची चोरी केली आहे. चोरांनी तोंडाला कापड बांधुन चोरी केली आहे. मात्र, तरीही चोरटे cctv मध्ये आले आहेत.  दुकानदाराने लावलेले सर्व cctv कॅमेरे चोरांनी बंद केले. काही कॅमेरे कापड लावुन ठेवले आणि चार तास दुकानातील साड्या चोरी करुन नेल्या आहेत.जवळपास एक वाजण्याच्या सुमारास चोर आतमध्ये शिरले आणि पहाटे  साडे चार वाजण्याच्या वेळी बाहेर पडले. तसेच या चोरीच्या घटनेत एका महिलेचा समावेश असल्याचे समोर आले आहे  असे सीसीटीव्ही मध्ये निदर्शनास आले आहे.  भिगवणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी होण्याची पहिलीच वेळ आहे...

Web Title: Theft of Rs. 35- 40 lakhs in saree shops at Bhigavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.