एटीएम फोडून अडीच लाखांची चोरी

By admin | Published: June 26, 2017 03:45 AM2017-06-26T03:45:06+5:302017-06-26T03:45:06+5:30

एटीएममध्ये कार्ड टाकून बनावट चावीने मशिनचे हूक उघडून दोन लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी एका महिन्यानंतर

Theft of two and a half million rupees | एटीएम फोडून अडीच लाखांची चोरी

एटीएम फोडून अडीच लाखांची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : एटीएममध्ये कार्ड टाकून बनावट चावीने मशिनचे हूक उघडून दोन लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी एका महिन्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २८ मे २०१७ ला चिंचवड, लिंक रोड येथे रात्री घडली होती. या प्रकरणी शनिवारी, २४ जूनला चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गोविंद धुमाळ (वय २४, रा. रहाटणी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सचिन हे एका खासगी एजन्सीमार्फत बँकांच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे काम करतात. चिंचवड लिंक रोड येथील बँक आॅफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरले होते. त्या वेळी त्यांच्याबरोबर त्याचे सहकारी देखील होते. रक्कम भरल्यानंतर ट्रान्झॅक्शन झाल्याचे दिसून आले नाही. सचिन पुन्हा रक्कम भरण्यासाठी आले होते. त्या वेळी एटीएममधून पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Web Title: Theft of two and a half million rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.